Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

महिलांच्या सबलीकरणाचे आणि स्वरक्षणाचे धडे देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मराठवाडा संघटक सक्षणा सलगर यांच्यासह आठ जणांविरूध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर ठोकपणे बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या सलगर ताई स्वतः आपल्या भावजईवर अन्याय करण्याच्या आरोपावरून सलगर ताईवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

प्रकरण असे की, तेर येथील मनिषा सचिन सलगर यांना पतीच्या निधनानंतर सासू-सासऱ्यांसह सासरच्या मंडळींकडून १८ मार्च ते ९ मे या कालावधीत दोन मुलींपैकी एक मुलगी राखी विठ्ठल गडदे यांना दत्तक द्यावी, विवाहितेने माहेरी जाऊन रहावे या कारणासाठी शिवीगाळ करीत धमकी दिली़ तसेच मारहाण करून दोन्ही मुली राखी गडदे यांना दत्तक देऊन शारीरिक मेहनतीचे काम लावून शारीरिक, मानसिक जाच केल्याची फिर्याद मनिषा सलगर यांनी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला आहे.

मनिषा सचिन सलगर यांच्या फिर्यादीवरून सासू केसरबाई सिद्राम सलगर, सासरे सिद्राम लिंबाजी सलगर, नणंद सक्षणा सिद्राम सलगर, नणंद सरस्वती सिद्राम सलगर, नणंद राखी विठ्ठल गडदे, नंदवा विठ्ठल गडदे, दीर रणधीर सिद्राम सलगर, जाऊ रूपाली रणधीर सलगर (सर्व रा़ तेर ता़ उस्मानाबाद) यांच्याविरूध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि वाघ हे करीत आहेत़. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कठोर भूमिका मांडणाऱ्या आज आपल्याच पक्षाच्या एक महिला पदाधिकाऱ्यांवर कारवाही करणार का? हे आता पाहावे ला

Leave a comment

0.0/5