शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभरात पर्यावरणविषयक आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रचंड गर्दी झाली. लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले होते.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलेही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी आली होती.
‘आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो!’ असा बॅनर घेऊन ही मुले नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातून आली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. सोबत दै. ‘सामना’चे मुख्य वितरक बाजीराव दांगट, महापौर विश्वनाथ महाडेश्वर. शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांनीही आदित्य ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.
शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. सोबत सिद्धेश आणि योगेश कदम. शिवसेना नेते राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. संजय सूरे, किरण जोगळेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही शुभेच्छा दिल्या. युवासेनेच्या कल्याण जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देतानाच राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द केला.