Skip to content Skip to footer

वंचितच्या विरोधात काँग्रेस उतरवणार दलित चेहरे ?

लोकसभा निवडणुकीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला अनेक ठिकाणी काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबरोबर जर प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी केली नाही तर वंचित विरोधात कसे मैदानात उतरायचे यावर सध्या काँग्रेस मध्ये चर्चा चालू झालेली आहे. यंदाच्या निवडणुकीला वंचित विरोधात दलित चेहरे म्हणून सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, जयवंत आवळे यांना निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरवण्याच्या विचार काँग्रेस पक्ष करत असताना दिसत आहे. या रणनीतीचा काँग्रेस पक्षाला किती फायदा होईल हे येणाऱ्या निवडणुकीला दिसून येईल.

लोकसभा निवडणुकीला सुशीलकुमार शिंदे, गायकवाड यांना काँग्रेस पक्षाने मैदानात उतरवले होते. परंतु लोकसभेला या सर्व उमेदवारांचा पराभव झाला होता. आणि विधानसभा निवडणुकीला वंचितच्या विरोधात पुन्हा पराभूत उमेदवारांना उतरवून काँग्रेस स्वतःचे हसू करून घेत आहे असेच आजच्या परिस्तिथी वरून दिसून येते.

तसेच केंद्रातून उमेदवार न लादण्याच्या निर्णयावर सुद्धा चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक उमेदवार हे केंद्रात ठरले जातात त्यामुळे राज्यातील इच्छुक उमेदवाराची समजूत काढण्यात नाकीनऊ येते यावर सुद्धा काँग्रेस कमिटी मध्ये एकमत झाले आहे.

Leave a comment

0.0/5