Skip to content Skip to footer

काँग्रेस नेत्यांची पक्ष प्रमुखाकडे मागणी दिल्लीतून उमेदवार लादु नका….

लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष राज्यातून ते थेट दिल्लीपर्यंत हादरला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधासभेला महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी कंबर कसली आहे. परंतु काँग्रेसचा जिल्हापरिषदेचा उमेदवार निवडण्यासाठी महाराष्ट्रातील नेते केंद्रातील नेत्यांकडे फिल्डिंग लावतात.

त्यामुळे राज्यातील जेष्ठ नेत्यांना आपल्या आणि कट्टर कार्यकर्त्याच्या मना विरुद्ध काम करावे लागते. त्यामळे येणाऱ्या निवडणुकी संदर्भात मुंबईमध्ये या बैठक बोलवण्यात आली होती. राज्यातील प्रमुख नेते, आमदार आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. यामध्ये विधनासभा निवडणुकीत दिल्ली वा मुंबईतून उमेदवार न लादता स्थानिकांना एकमताने उमेदवार निश्चित करू द्यावे, अशी जोरदार मागणी कॉंग्रेस नेत्यांनी केली.

दादर येथील टिळक भवन येथे कॉंग्रेसच्या राज्यव्यापी बैठकीला गुरुवारी सुरुवात झाली, भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात येत आहे, त्यामुळे कॉंग्रेसने देखील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान, पक्षाची स्थिती बिकट बनली असून आता तरी नेत्यांनी एकमेकांतील गटबाजी थांबवा, अशी विनंती जेष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. परंतु काँग्रेस पक्षाचे नुकसान हे अंतर्गत गटबाजीमुळेच झालेले दिसून येत आहे. त्यातच विधानसभा तिकीट वाटपाच्या दरम्यान केंद्रातील नेते काय निर्णय घेतात हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

Leave a comment

0.0/5