Skip to content Skip to footer

पार्थ पवार यांच्या पराभवामुळे अजित पवार गटाचा रोहित पवारांना विरोध…

यंदाची लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. परंतु या निवडणुकीला राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारने यांनी पराभव केला होता आणि हा पराभव अजित पवार तसेच त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याच्या जिव्हाळी लागला होता. म्हणूनच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. कारण पार्थ यांची उमेदवारी शरद पवार यांनी जाहीर केल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या या निर्णयाला रोहित पवार यांनी विरोध दर्शविला होता. तसेच पार्थ यांच्या प्रचाराला रोहित पवार हे सक्रिय सुद्धा दिसलेले नव्हते.

कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे गटाचे मानले जाणारे पवारांचे नातू रोहित पवार गेल्या दोन वर्षांपासून विविध कामे करीत आहेत़ लोकांच्या समस्या सोडवित आहेत़. जेथे पालकमंत्री पोहचू शकले नाही तेथे पवार पोहोचले आहेत़ रोहित पवार यांचेमुळे तरुणांची मोठी फळी मतदारसंघात राष्ट्रवादीशी जोडली आहे़ त्यामुळे पवार यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती़
त्यावर पवार यांनी ‘तुझी मागणी मान्य झाली’ असे उत्तर दिले होते, त्यामुळे रोहित पवारच या मतदारसंघातील उमेदवार असतील, असे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत मात्र, गुरुवारी जिल्हा परिषदेत दादा गटाचे परहर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंजुषा गुंड यांच्या उमेदवारीची मागणी केली . यावेळी बोलताना परहर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून रोहित पवार मतदारसंघात विविध कामे करीत आहेत़ त्याचा फायदा आम्हाला होईल़ पण ते बाहेरील उमेदवार आहेत .

Leave a comment

0.0/5