संभाजी नगर मध्ये एमआयएमचे खासदार जलील निवडून आल्यानंतर ते आपल्या कामामुळे चर्चेत राहिले नसून आपल्या हुकूमशाही वृत्तीमुळे सध्या चर्चेत राहत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजवलेला हौदोसाने संभाजी नगर मध्ये दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजी नगर मध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंग जोंग उन निवडणून आला आहे? असा सवाल नगरसेवक अफसर खान यांनी केला आहे.
खा. इम्तियाज जलील यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नगरसेवक अफसर खान यांनी केली. खान यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करत जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचं म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, आता पाच वर्षे माझी आहेत. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं आहे त्यांना चिरडून मारु, असं वक्तव्य जलील यांनी केले आहे. असा दावा नगरसेवक खान यांनी केला. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधातही आक्षेपार्ह वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.