Skip to content Skip to footer

मंत्री विस्तार चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली “मातोश्री”

मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’ गाठली. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल टि्वट करून माहितीही दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाला आहे.

बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यापासून सुरु होती, खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला होता, मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चासुरु झाली होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी थेट मातोश्री गाठून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा तर्फे कोणत्या चेहऱ्यांना मंत्री मंडळात स्थान मिळते हे लवकरच समोर येईल.

Leave a comment

0.0/5