Skip to content Skip to footer

जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन शिवसेनेने केला ओबीसी समाजाचा सन्मान

जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन शिवसेनेने केला ओबीसी समाजाचा सन्मान

 

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून शिवसेनेकडून जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. आता जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने मंत्रिपद दिल्यामुळे त्यांच्यामागील तेली आणि ओबीसी समाज हा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आणि महायुतीच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे.

जयदत्त क्षीरसागर हे मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे नेते आहेत. सध्या राजकारणात कार्यरत असलेल्या ओबीसी नेत्यांपैकी हेवीवेट नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. शिवाय ते तेली समाजाचे अध्यक्ष देखील आहेत. जयदत्त क्षीरसागर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बीडमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार म्हणून विजयी झाले होते.

असं असलं तरी केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समुदाय आहे. शिवसेनेत दाखल झालेल्या क्षीरसागर यांना शिवसेनेने मंत्रिपद दिल्याने ओबीसी समाजाचा सन्मान केल्याची भावना व्यक्त होत आहे. साहजिकच आगामी निवडणुकीत शिवसेनेला आणि महायुतीला प्रचंड फायदा होणार असल्याचं चित्र आहे, तर राष्ट्रवादीसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

इतके दिवस जातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीने नेत्यांचा वापर करून घेतला पण त्यांना योग्य तो सन्मान न देता स्थानिक राजकारणापुरते मर्यादित ठेवलं त्याउलट शिवसेनेने प्रवेशानंतर महिन्याभरातच मंत्रिपद देत क्षीरसागर यांचा केवळ वापर करून घेतला जाणार नाही हा संदेश दिल्याचं बोललं जातं.

 

जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीसाठी आता पर्यंत कधीही न भरून निघणारी खिंडार…

Leave a comment

0.0/5