मुंबई – भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानचा पराभव करून विजय मिळवला. दुसरीकडे, राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन करणारे ठराव आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी हा ठराव मांड.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सोमवार पासून मुंबईत सुरुवात झाली आहे. तेरावी विधानसभा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे.
दुसरीकडे, भारताने रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात ८९ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विधानसभेत धनंजय मुंडे यांनी भारतीय संघाचा अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
तसेच पुढील सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा सुद्धा यावेळी देण्यात
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. मात्र, धनंजय मुंडे यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर शंका उपस्थित केली. किमान नमुना पद्धतीनं ही आकडेवारी वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हे व्यापक जनहितार्थ तपासून पहावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.