Skip to content Skip to footer

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक: जयदत्त क्षीरसागर नवे कॅबिनेट मंत्री

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक: जयदत्त क्षीरसागर नवे कॅबिनेट मंत्री

 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळालं आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर घड्याळ सोडून शिवबंधन बांधलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीतील छगन भुजबळ यांच्यानंतरचे सर्वात पॉवरफुल ओबीसी नेते म्हणून ओळखलं जातं. त्यांना मानणारी व्होट बँक संपूर्ण राज्यभरात असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत युतीला त्याचा फायदा होईल असं चित्र आहे.

 

जयदत्त क्षीरसागर यांनी आधी लोकसभा निवडणुकीत युतीच्या सभांना हजेरी लावली होती. त्यानंतर राष्ट्रवादिला सोडचिट्ठी देत त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश आणि त्यापाठोपाठ त्यांना मिळालेलं मंत्रिपद या घडामोडी बऱ्याच प्रमाणावर राजकीय उलथापालथ ठरू शकतात आणि आघाडीला याचा चांगलाच फटका बसू शकतो.

 

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

-तेली समाज अध्यक्ष

-महाराष्ट्रातील हेवीवेट ओबीसी नेते

-शिक्षण आणि सहकारी संस्थांचं मोठं जाळं आणि दांडगा जनसंपर्क असलेले नेते

-दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचे सुपुत्र

-राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी जयदत्त क्षीरसागर आणि केशरबाई क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत यावं यासाठी खुद्द शरद पवारांना क्षिरसागर यांच्या घरी जाऊन मनधरणी करावी लागली होती

Leave a comment

0.0/5