Skip to content Skip to footer

विरोधी पक्ष नेते पदावरून भाजपा-शिवसेना पक्षाने काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या……..

विधानपरिषदेचे उपसभापती पद देणार असाल तर तरच विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यास मान्यता देऊ, अशी भूमिका भाजप-शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, असे पत्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले. विरोधकांच्या पत्रावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे बागडे यांनी सांगितले. मात्र लवकर म्हणजे कधी, हा प्रश्न पडल्यामुळे विरोधकांनी धावपळ सुरू केली. अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली, तेथेही काही तोडगा निघाला नाही.

संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेत, तुम्ही उपसभापतींचा निर्णय घ्या, आम्ही विरोधी पक्षाचा निर्णय घेऊ असे सांगितल्याचे समजते. साताऱ्यातील राजकीय रणधुमाळीनंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका घेतली होती.
त्यांनीच राष्ट्रवादी सोडली तर पक्षाची अडचण होईल म्हणून राष्ट्रवादीने उपसभापतीपद शिवसेनेला देण्याची तयारी दर्शविली आहे आणि विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसला घेण्यास सांगितले आहे.द्या सकाळी पुन्हा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल.

Leave a comment

0.0/5