Skip to content Skip to footer

राज्याचे अर्थसंकल्प फडणवीस सरकार आज जाहीर करणार…….

फडणवीस सरकारचे मंत्री मंडळ विस्तार येत्या रविवारी दिमाखात पार पडले या मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर आज राज्याचे अर्थसंकल्प तथा शिवसेना-भाजपा सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प आज जाहीर होणार आहे. हा फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि औद्यगिक क्षेत्रासाठी काही विशेष तरतुद असणार का? याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकासाच्या पायऱ्या चढत आहे. राज्याने मागील चार वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही अपेक्षित यश मिळवले आहे, अशी महिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार असून विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी अर्थसंकल्प सादर करतील. तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दिपक केसरकर अर्थसंकल्प मांडणार आहेत. विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात विविध घटकांना खूश करण्यासाठी काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही दिले असून धनगर समाजाला अर्थसंकल्पात दिलासा देण्याचेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठीही या अर्थसंकल्पात विशेष घोषणा असण्याची शक्यता आहे. राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांसाठीही या अर्थसंकल्पात मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे

Leave a comment

0.0/5