Skip to content Skip to footer

“जो रामाचा नाही तो कामाचा नाही” राम मंदारीवरून उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक…..

राम मंदिरच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व विजयी खासदारांना बरोबर घेऊन अयोध्या वारी सुद्धा केली होती. तेव्हा सुद्धा त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर सुचक विधान केले होते. या प्रकरणासंदर्भात त्यांनी आज सामना संपादकीयमधून आपली भूमिका मांडली आहे. ‘जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे.

३५० खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला ३५० खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही?’, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावर सामनाच्या अग्रलेखातून रॅम मदरच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडण्यात आलेली आहे.

‘निवडणुकीनंतर सर्व विजयी खासदारांसह रामलल्लांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ’ हा आमचा शब्द होता व ठरल्याप्रमाणे आम्ही आलो. खरे तर अयोध्यावासीयांचे म्हणा नाही तर रामलल्लांचे, पण आमचे ठरले आहे. आम्ही अयोध्येत येत राहू असे आमचे ठरले आहे. श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे.
ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. रामाच्या नावाने समुद्रात दगडही तरले. रामसेतू उभा राहिला. त्याच रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे १८ खासदार निवडून दिले. प. बंगालात भाजपची ताकद तोळामांसाचीच, पण रामविरोधकांना धडा शिकविण्यासाठीच बंगाली जनतेने विजयाचा रसगुल्ला भाजप तोंडी भरवला.

Leave a comment

0.0/5