पक्षातील अंतर्गत कलहामुळे येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी टिकणार का ?

राष्ट्रवादी | Read BJP's activities as

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने राज्यात सपाटून मार खाल्ला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पाच आणि काँग्रेसच्या वाट्याला फक्त एकच जागा आली होती. त्यामुळे कधीकाळी नंबर वनचा पक्ष म्हणून समजला जाणारा काँग्रेस पक्ष राज्यात संपुष्ठात येण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.

आता काहीशी तीच परिस्थिती राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा झालेली दिसून येत आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वीच बीडचे वजनदार नेते तथा राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या जातीयवादी राजकारणाला कंटाळून शिवसेना पक्षात प्रवेश होता. आणि प्रवेश करताच सेना-भाजपा सरकारच्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून वर्णी सुद्धा क्षीरसागर यांची लागली होती. त्यातच आता अजून एका माजी मंत्र्यांचे नाव राष्ट्रवादी सोडणार म्हणून पुढे येत आहे. आज पर्यंत फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या पवारांचा पक्ष कुठेतरी फुटत असताना दिसत आहे.

राज्याचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर हे सुद्धा लवकरच राष्ट्रवादी पक्षाला राम-राम ठोकून शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधण्याच्या तयारीत आहे. साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे.
तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना विशेष यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले होते.
एकीकडे पक्षातील निष्ठवंत कार्यकर्त्यांनी आधीच राष्ट्रवादी सोडलेली आहे. तसेच काहीजण राष्ट्रवादी लवकरच सोडण्याच्या तयारीत असताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात चालू असलेली “आउटगोइंग” रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कोणत्या उपाययोजना करतात हे सुद्धा पाहावे लागणार आहे. या सर्व घडलेल्या घडामोडीचा राष्ट्रवादी पक्षावर काय परिणाम होणार हे आता सांगायची गरज नाही. आज पर्यंत शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी चालत होती. परंतु अजित पवार यांच्या हट्टापायी पार्थ यांना लोकसभेला तिकीट देण्यात आलेली होती पण या निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाला होता. त्यामुळे राष्ट्र्वादीत पवारांचे पहिल्या सारखे कोणी ऐकत नाही असेच आजच्या परिस्थितीवरून दिसून येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here