Skip to content Skip to footer

वांद्रे येथील शासकीय इमारतीचा होणार लवकर कायापलत – ऍड. अनिल परब

वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा फिजिबिलिटी रिपोर्ट आणि मास्टर प्लॅन कोरिया सरकारच्या मदतीने तयार करण्याचा करार झाला असून काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत ३७० इमारती असून राज्य सरकारच्या सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या इमारती चाळीस ते पन्नास वर्षे जुन्या झाल्या आहेत. यातील बहुतांश इमारती जीर्ण झालेल्या आहेत. काही इमारतींना तडेही गेले आहेत. इमारतींच्या छताचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या वसाहतीचा पुर्नविकास करण्याची योजना राबविण्यात यावी यासाठी शिवसेनेकडून सातत्याने पाठपुरवा करण्यात येत आहे.

यासंदर्भात शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी वांद्रे विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे प्रश्न उपस्थित केला. वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्पा अंतर्गत बहुमजली टॉवर उभारण्यात येणार असतील तर त्याचा सुसाध्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) सरकारला मिळाला आहे का, याबाबतची विचारणा त्यांनी केली. तसेच वसाहतीत वारंवार घडणाऱया दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीची कोणती कामे हाती घेण्यात आली आहेत, असा प्रश्न परब यांनी विचारला. त्यावर देण्यात आलेल्या लेखी उत्तरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट आणि मास्टर प्लॅन कोरियाच्या मदतीने तयार करण्याचा करार झाला आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडिटनुसार स्ट्रक्चरल दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने निधीच्या उपलब्धतेनुसार हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5