Skip to content Skip to footer

आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊ देणार नाही – मंत्री रामदास आठवले

लोकसभेचे अध्यक्ष म्हणून भाजप खासदार ओम बिर्ला यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. बिर्ला यांची सभापती पदी नियुक्ती झाल्यानंतर सभागृहातील अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेतून बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या तर कॉंग्रेसवर टोलेबाजी केली. बिर्ला हे अनुभवी व्यक्ती आहेत. ते कधीच हसत नाहीत. परंतु मी तुम्हाला सभागृहात हसवणार असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच अधेमध्ये मला सभागृहात बोलण्याची संधी द्या अशी देखील विनंती आठवले यांनी यावेळी केली. आपल्या कवितेतुन पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमतात निवडून दिले आहे. पुढील पाच काय तर अनेक वर्ष आमचंच सरकार असेल असं सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आम्ही तुम्हाला सत्तेत येऊच देणार नाही, असं आपल्या शैलीत काँग्रेसवर बोलून प्रत्यक्ष टोला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी अनेकदा काँग्रेसने आपल्याला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली होती. परंतु हवा कोणत्या दिशेने जात हे मी अचूक ओळखलं आणि भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

Leave a comment

0.0/5