शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला या वर्धापन दिन सोहळ्याला शिवसेना पक्षाचे मंत्री, खासदार , आमदार तसेच पदधिकारी यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. परंतु या वर्धापन दिन सोहळ्याची चर्चा जास्त रंगली ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने, लोकसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपा पक्षाने महाराष्ट्रात भरघोस यश मिळवले होते. आणि युतीच्या निर्णयापूर्वी जो निर्णय घेण्यात आला होता. त्याच फॉर्मुल्याने येणारी विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्र लढणार आहे.
परंतु लोकसभेच्या भरघोष यशानंतर विरोधकांनी शिवसेना-भाजपा युती तुटावी म्हणून युती बद्दल अपप्रचार सुरु केला होता. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने केला होता. पण काल झालेल्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी लावलेली हजेरी विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर आहे असेच म्हणावे लागले. या वर्धापन दिनाला सभेत संबोधताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यामध्ये राष्ट्रीयत्वाची बीजे रोवली आहेत आणि आपले हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा आहे. शिवरायांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर आपले युतीचे सरकार काम करीत आहे. असे सुद्धा बोलून दाखविले.
https://www.facebook.com/Shivsena/videos/338026540445685/?t=3