संसदेच्या संयुक्त सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी संबोधित केले. या भाषणात राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या पुढच्या पाच वर्षाचा प्लॉन कसा असेल याची माहिती दिली. या भाषणादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपतींनी जवळपास एक तासाहून अधिक वेळ भाषण केले. या भाषणादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोबाईलमध्ये काही तरी पाहण्यात व्यस्त होते. राष्ट्रपतींनी भाषण सुरु केल्यानंतर पहिली २४ मिनिटे राहुल गांधी मोबाईलमध्ये काही तरी टाईप करत होते.
त्यानंतर देखील त्यांनी राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्याऐवजी ते शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांच्याशी बोलत होते. एका बाजूला राष्ट्रपतींचे भाषण सुरु असताना राहुल गांधी मात्र मोबाईलची स्क्रिन पाहण्यात व्यस्त होते. राष्ट्रपतींचे भाषण अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या भाषणावर बेंचला हात लावला. राष्ट्रपतींच्या भाषणाच्या पहिल्या ४० मिनिटात त्यांनी बेंच वाजवून अनुमोदन दिले नाही. राहुल गांधींनी भाषण संपण्यावेळी अखेरच्या काही सेंकदावेळी बेंच वाजवला. तर शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणा दरम्यान 6 वेळा बेंच वाजवला.