Skip to content Skip to footer

“एक देश एक निवडणूक” संकल्पनेला देवरांचा पाठिंबा, तर काँग्रेसचा विरोध…….

” एक देश एक निवडणूक ” या विषयी चर्चा करण्यासाठी भाजपा सरकारने देशातील सर्व पक्ष अध्यक्षांना आमंत्रण दिले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संकल्पनेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे. एकीकडे काँग्रेस या संकल्पनेला विरोध करत असताना त्यांच्याच पक्षातील नेते तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार मिलिंद देवरा यांनी या संकल्पनेला पाठिबा दर्शविला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते सुद्धा पक्षविरोधात मत मांडताना दिसत आहे यावर भाष्य करताना देवरा त्यांनी आपले मत मांडलेले आहे.

‘एक देश, एक निवडणूक’बाबत चर्चा करण्यासाठी व सर्व पक्षांचे मत जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक बैठक झाली. या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मात्र मोदी सरकारच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. देवरा यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत त्यांचे मत मांडले आहे. या पोस्टमधून त्यांनी काँग्रेसचे बहिष्कार घालणं दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
‘मी माजी खासदार आहे व चार वेळा निवडणुका लढवल्या आहेत.
त्यामुळे मला असं वाटतं की सतत देशात निवडणुका सुरू राहणं हे सुशासनामध्ये अडथळा निर्माण करतं. सततच्या निवडणुकांमुळे नेते महत्वाच्या मुद्दांकडे लक्ष देऊ शकत नाही आणि सध्या हा देशासमोरील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे असे मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे. १९६७ पर्यंत देशात एकत्रित निवडणुकाच होत होत्या याची आठवणही देवरांनी करून दिली आहे. ‘एक देश एक निवडणूक’ हा देशातील एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो’, असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5