आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केले आहे, तर त्यांना भाजपा मध्ये घेऊ नका, अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिवसेना पसंख प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला आहे. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, वर्धापन दिनानिमित माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यावेळी, मुख्यमंत्र्यांकडे अशी काय शक्ती आहे काही माहिती नाही. आम्ही विरोधी पक्षात उतरणार होतो तर आम्ही तुमच्यासोबत आलो. राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते होते तर ते देखील भाजपमध्ये आले. आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केलं आहे, तर त्यांना भाजपत घेऊ नका असे अजित पवारांनी सांगितलं आहे, असे ठाकरे म्हणाले. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, नरेंद्र मोदीच्या पंतप्रधान होण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. मला दुसऱ्यांच्या पराभवानंतर आनंद साजरा करायला आवडत नाही. मात्र सावरकरांना डरफोक म्हणणाऱ्यांना हरवलं यांचा आनंद आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटले