काही दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता, त्यावेळी हिंदुस्तानच्या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की ३०० जागा जिंकून मनमानी करू, तर ते शक्य नाही. घटनेचा दाखल देत त्यांना मी सांगू इच्छितो की, असदुद्दीन ओवेसी तुमच्याशी लढेल, अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी लढेन. हिंदुस्तानला एकसंध ठेवायचं आहे, आम्ही हिंदुस्तानला एकसंध ठेवू. आम्ही तुमच्या एवढेच इथले रहिवासी आहोत. भाडेकरू नाहीत, तर भागीदार आहोत, अशी टीका ओवैसी यांनी केली होती.
या टीकेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना स्टाईलने उत्तर दिलेले आहे. काल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनादिनी उपस्थितांना उद्देशून बोलत होते. ओवेसी यांच्या या वक्तव्यावर सडाडून टीका सुद्धा केली होती. दरम्यान, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी ओवैसी यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. ओवेसी म्हणतो आम्ही या देशात भाडेकरू नाही. आम्ही समान भागीदार आहोत, तर वन्दे मातरम् म्हणायला लाज का वाटते.? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. इतकेच नव्हे तर, एवढं स्वातंत्र्य देऊनही तुमच्या मनातले किडे का वळवळतात?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.