राज्यात सर्वत्र दुष्काळग्रस्थ परिस्थिती निर्माण झालेली असताना सर्वच राजकीय पक्ष राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाशी दोन हात करण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे विरोधक भाजपा सरकारला या दुकाळजन्य परिस्थितीत जाब विचारत आहे. परंतु आज त्यांच्याच पक्षाचे आमदार सार्वजनिक कार्यक्रमात नाचताना व्यस्थ असताना दिसत आहे. व
र्धा जि्ह्यातील आर्वी येथील काँग्रेस आमदार अमर काळे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, यावेळी राज्यात दुष्काळासारखी भीषण परिस्थिती असल्याचं विसरुन ते लग्नाच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. जनतेसमोर राज्य सरकारवर टीका आणि खासगीत अशा प्रकारे डान्स केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.