Skip to content Skip to footer

दुष्काळ परिस्थितीवर अजित पवारांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ?

राज्यात यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापाऊनच दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्ष याच दुष्काळाचा फायदा घेत आपली राजकीय पोळी भाजताना दिसून येत आहेत. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत सरकारने सत्तेत येताच ‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत गावच्यागावं दुष्काळ-टँकरमुक्तीचं स्वप्न दाखवले. पण ५ वर्षात टँकर संख्या,फेऱ्या वाढल्याचं दिसतंय, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. परंतु ज्यांचे हात आधीच सिंचन घोटाळ्यात काळे झालेले आहेत त्यांना आज या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहतो का?

काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकाळात झालेला सर्वात मोठा घोटाळा म्हणजे “सिंचन घोटाळा” आज या सिंचन घोटाळ्यात दुष्काळावर भाष्य करणारे अजित पवार आणि ननवनिर्वाचित खासदार तटकरे यांची नावे समोर आलेली होती. एकूण ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे समोर आले होते. धरणे आणि कालव्याच्या बांधकामाचा अवाढव्य खर्च वाढवल्याचे समोर आले होते. यात चितळे समितीच्या रिपोर्ट मध्ये संपूर्ण ठपका त्यावेळच्या मंत्र्यावर ठेवण्यान आला होता. म्हणजे प्रत्यक्ष या घोटाळ्यात अजित पवारांचे नाव समोर आले होते.

आज जर सिंचन घोटाळा न करता हा पैसा योग्य ठिकाणी सिंचनासाठी लावला गेला असता तर यंदा महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा कमी प्रमाणात सहन कराव्या लागल्या असत्या. याला संपूर्णपणे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जबाबदार आहे. व हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन अजित पवार दुष्काळावर भाष्य करत आहे. त्यामुळे “उलटा चोर कोतवाल को दाटे” अशी काहीशी गत आज अजित पवारांची झालेली दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5