लोकसभा निवडणुकीला माजी खासदार नितेश राणे यांचा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भरघोस मतांनी पराभव करून पुन्हा एकदा कोकणात भगवा फडकवला आहे. त्यामुळे कुठेतरी राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाचे अस्तित्व कोकणात संपुष्ठात होत असताना दिसत आहे. याच भीतीने जर आपण सुद्धा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर निवडून लढलो तर आपला सुद्धा पराभव होईल या भीतीने आमदार निलेश राणे इतर पक्षाचा आमदारकीच्या निवडणुकीपुरता सहारा शोधत आहे.
त्यातच राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, आमदार नीतेश राणे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची मागणी धुडकावून लावली असल्याची माहिती राजन भोसले यांनी दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नीतेश राणे यांनी हाताचा पंजा निशाणी मिळविण्याचा खूप प्रयत्न केला होता, असा आरोपही राजन भोसले यांनी केला आहे.