नवीन बदलानुसार, ऊर्जामंत्री बावनकुळे साहेबांना बोलवताना आम्ही… वो पन्नास दोन कुळे साहेब…. पन्नास दोन कुळे साहेब आले बघा… असे म्हणायचे का? तसेच,मुख्यमंत्री महोदयांचं नाव घेताना, फडण दोन-शून्य असे म्हणायचे का? असा प्रश्न पाठ्यपुस्तकातील अंकवाचण्याच्या नवीन पद्धतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर, सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. अजित पवारांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत प्रतिउत्तर दिल आहे.
बालभारती मराठीच्या पुस्तकातील काही वाक्यांचे वाचन करत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना टोला लगावला. आई कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण असे पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील उतार्यांत असलेले वाक्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वाचून दाखवल्रे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख करत खिल्ली उडवली.