Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती…….

२०१९ च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. २०१४ च्या निवडणुकीला मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा यंदाच्या निवडणुकीला मिळवून भाजपा देशातील प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. आता ब्रिटीश हेराल्ड २०१९ च्या सर्वेक्षणात व्लादिमीर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनले आहेत.

जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी ब्रिटीश हेराल्डने वाचकांचा पोल तयार केला होता. जगातील २५ प्रभावशाली व्यक्तींचा या नामांकनाच्या यादीत समावेश केला होता. समीक्षकांसमोर अखेरच्या टप्प्यात चार उमेदवारांची नावे ठेवण्यात आली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची या चार जणांच्या यादीत नावे होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत अव्वल नंबर पटकावला. मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर या निवड प्रक्रियेचे मुल्यांकन करण्यात आले आहे.

मोस्ट पॉवरफुल पर्सन २०१९ साठी मते नोंदवायला ब्रिटीश हेराल्डने वाचकांना एक ओटीपी दिला होता. ज्यामुळे एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक मते देणे शक्य नव्हते. मतदानाची प्रक्रिया शनिवारी थांबली. नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून निवड झाल्यानंतर ब्रिटीश हेराल्डच्या कव्हर पेजला मोदींचा फोटो झळकणार आहे.

Leave a comment

0.0/5