आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. जूनचा महिना संपायला आला तरी अजून राज्यात पावसाने हजेरी लावलेली दिसून येत नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्तिथी निर्माण झालेली दिसून येत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक आणि संभाजी नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शनिवारी, 22 जून रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. नांदगाव येथे शिवसेनेने सुरू केलेल्या पीक विमा मदत केंद्राला भेट देऊन तेथे ते शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे तत्पूर्वी सकाळी संभाजीनगरलाही जाणार आहेत. या दौर्यात ते लासूर स्टेशन येथे शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या पंधरवड्यात जालना जिल्हय़ातील साळेगाव घारे येथे चारा छावणीतील शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याची व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गावागावात पीक विमा मदत केंद्र स्थापन करून माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते.