Skip to content Skip to footer

लोकसभेत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला – मंत्री चंद्रकातदादा पाटील

लोकसभा निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात म्हणजे बारामती मतदार संघात जोरदार फिल्डिंग लावली होती. यासाठी खास भाजपाचे महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्याचे पालक मंत्री पाटील हे बारामती मतदार संघात तळ ठोकून बसले होते. त्यामुळे हा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीचे बडे डिग्गज नेते सुद्धा बारामती मतदार संघात प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. आता तीच पुनःरुत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला दिऊन येणार आहे असे सूचक वक्तव्य पुन्हा एकदा मंत्री पाटील यांनी केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधासभेला पुन्हा पवार परिवाराला आणि राष्ट्रवादीला अडचणीत आणायचे काम भाजपा करणार आहे असेच जाणवते.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना अडकवून ठेवत आम्ही पिंगा घालायला लावला, तर दुसरीकडे त्यांचे सर्व बालेकिल्ले उधवस्थ केले असल्याचं वक्तव्य केले आहे. सांगलीमध्ये आयोजिय कार्यक्रमात पाटील यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेसने आजवर बहुजनांना भाजपची भीती दाखवली, भाजप हा ब्राम्हणाचा पक्ष असल्याचं लोकांच्या मनावर बिंबवत काँग्रेसने बहुजन समाजाचे नुकसान केले. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

Leave a comment

0.0/5