Skip to content Skip to footer

परभणी पाराभवावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात पवारांसमोर राडा……..

 

लोकसभेला झालेला पराभव हा राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या आणि नेत्याच्या जिव्हाळी लागलेला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची विभागीय बैठका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या आहे. मुंबईत आज झालेल्या बैठकीत परभणीतील कार्यकर्ते शरद पवारांसमोरच एकमेकांना भिडले. निमित्त झाले ते आलेल्या ‘राजेश विटेकर यांचा पराभव कसा झाला?’ या फेसबुकवरील पोस्टचे. कार्यकर्ते इतके भिडले की त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

शरद पवार रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील चार जिह्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करीत होते. संभाजीनगरची बैठक संपल्यानंतर परभणीची बैठक होणार होती. बाहेर कार्यकर्तेही जमले होते, मात्र ही बैठक होण्याआधीच राजेश विटेकर आणि मधुसूदन केंद्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील चार जिह्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करीत असताना बाहेर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक राजकारणाच्या वादातून गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती.

‘राजेश विटेकर यांचा पराभव कसा झाला?’ ही पोस्ट सोशल मीडियावर कोणी टाकली यावरून सुरू झालेली वादावादी चांगलीच पेटली. अखेर हे सोडविण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पण तरीही वादावादी शांत होत नसल्याने जादा कुमक मागवावी लागली. कार्यकर्त्यांची पांगापांग झाली, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. लोकसभेतील पराभवावरून तसेच अन्य कारणांवरून राष्ट्रवादीत अंतर्गत वादाला सुरवात झालेली दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5