Skip to content Skip to footer

राम मंदिराच्या निर्माणाचे कार्य जलद गतीने करा शिवसेनेच्या सर्व खासदारांची संसदेत मागणी…….

 

अनेक वर्ष नायालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या राम मंदिराच्या मुद्द्यांवर शिवसेनेच्या सर्व खासदारानी संसदेत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या सर्व विजयी खासदारांना बरोबर घेऊन अयोध्या वारी सुद्धा केली होती. या दौऱ्याला सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंदिर निर्माणच्या प्रश्नाला सूचक उत्तर सुद्धा दिले होते. आज अनेकांनी केलेल्या अविरत प्रयत्नांमुळे हे सरकार आले तसेच हे सरकार पुन्हा सत्तेवर यावे यासाठी प्रभू रामचंद्राचा आशीर्वादही या सरकारच्या पाठीशी होता. त्यामुळे रामाचे स्मरण ठेवत केंद्र सरकारने तातडीने अयोध्येत पवित्र राममंदिर निर्माणाचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी आग्रही मागणी आज शिवसेनेने लोकसभेत केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी राममंदिर निर्माणाचा मुद्दा उपस्थित केला. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारले जावे ही देशातील कोटय़वधी हिंदूंची भावना आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करून राममंदिर निर्माणाच्या चळवळीला वेग दिला दिला होता याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
लोकसभा निवडणुकीनंतरही उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला गेले होते. राममंदिरासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे. या सरकारकडून देशातील हिंदूंना मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती दाखवत सरकारने राममंदिर निर्माणाला सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी खासदार राऊत यांनी संसदेत केली.

Leave a comment

0.0/5