Skip to content Skip to footer

माणिकराव गावीत यांचे पुत्र भारत गावीत भाजपाच्या वाटेवर ?

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर कॉंग्रेसमधून आउटगोइंग सुरूच आहे. कुणी सेनेत तर कुणी भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याने कॉंग्रेस पक्षपुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला अडचणीत वाढ होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या आयात निर्यातीचे सत्र सुरु झाले आहे. नागपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज हातात शिवबंधन बांधले असताना आता आणखी एका माजी मंत्र्याच्या मुलाने भाजपाची वाट धरली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नंदूरबारमधील माजी खासदार असलेले माणिकराव गावीत यांचे चिरंजीव भरत गावीत हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भरत गावित यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. गावित यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्यामुळे याठिकाणी काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

Leave a comment

0.0/5