मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी तसेच प्रवासाला लागणाऱ्या वेळेची बचत व्हावी म्हणून मुंबईतील लाखो नागिरकांना कोस्टल रोड हवा आहे अशी माहिती बृहमुंबई महानगर पालिकेने कोर्टात दिलेली आहे. काही महिण्यापुर्वी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर महाडेश्वर तसेच माजी मनपा आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडचे भूमिपूजन झाले होते.
महापालिकेच्या वतीने २९.२ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. या कोस्टल रोडसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घेऊनच या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकहिताच्या या प्रकल्पाला विरोध करणे चुकीचेच असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला.