Skip to content Skip to footer

राजू शेट्टी आपण पक्षाचा “स्वाभिमान” काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला…….

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे हतकलंगने मतदार संघातुन खासदार म्हणून २०१४ ला संसदेत निवडून गेले होते. परंतु २०१९ च्या निवडणुकीला शिवसेनेचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांनी एक लाख मतांनी शेट्टी यांचा पराभव केला होता. या पराभवाला कारणे सुद्धा अनेक आहे. आज ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर शेट्टी खासदार म्हणून निवडून येत होते. त्या शेतकऱ्यांचा शेट्टींनी विश्वासघात केला होता. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीला शेट्टी यांनाही डावलून तेथील जनतेने धैर्यशील माने यांच्या बाजूने कौल दिला होता.

खरं पहिले तर शेट्टी यांची संघटना ही शेतकऱ्याच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठीच “स्वाभिमानी शेतकरी संघटना” स्थापन झालेली होती. शेट्टी यांचा संघर्ष हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारखानदार नेत्यांशीच चालू होता. म्हणुणच कोल्हापुरात नव्हे तर अख्या राज्यात त्यांच्या स्वाभिमानी पक्षाचे जाळे पसलेले दिसून येत होते. परंतु २०१९ च्या निवडणुकीला राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून शेट्टी यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला होता. २०१९ च्या निवडणुकीला जस-जसे शेट्टी राष्ट्रवादीच्या नेत्यानंबरोबर दिसू लागले होते. तस-तसे शेट्टी स्थानिक जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मनातून उतरत चालले होते.

म्हणूनच २०१९ च्या निवडणुकीला शेट्टी यांना घरी बसवून धैर्यशील माने यांनी हतकलंगने मतदार संघातून जिंकून आणले होते. आणि आता पुन्हा तीच चुकी विधानसभेला शेट्टी करताना दिसून येत आहे. आज आपल्याच पक्षातून कारखानदार म्हणून ओळखले जाणारे प्रतीक पाटील यांच्या भावाला तिकीट देऊन कुठेतरी आपल्या पक्षाच्या नियमांना धक्का लावण्याचे काम शेट्टी यांनी केले होते. आज राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना फक्त सुडेचे राजकारण करतांना शेट्टी दिसत आहे. असेच आज त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे.

एकीकडे शिवसेना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळग्रस्थ शेतकऱयांच्या पाठीशी खंबीरपण उभे असताना आज येणाऱ्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेबद्दल शेट्टी उलट-सुलट बोलत आहे. आज शेतकऱयांचा पक्ष म्हणून घेणाऱ्या स्वाभिमानी पक्षाने दुष्काळ परिस्थिती शेतकऱयांना काय मदत केली. फक्य आज मदत करणार्यांवर आरोप करण्याचे काम शेट्टी कारणात दिसत आहे. यावर हेच सिद्ध होते ही, शेट्टी यांना शेतकऱ्याच्या प्रश्नापेक्षा सुडाचे राजकारण करण्यात शेट्टी यांना जास्त आनंद भेटत आहे. हेच आजची परिस्थितीतून दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5