Skip to content Skip to footer

स्वातंत्र्यसैनिकांसाठी राज्य शासनाने घेतला महत्वाचा निर्णय….

राज्य सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तसेच आणीबाणीच्या काळात शिक्षा भोगलेल्या मिसाबंदींना पेन्शनही सुरु करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, राज्य सरकारकडून सर्व प्रकारच्या स्वांतत्र्य सैनिकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा लढा, गोवा मुक्ती संग्राम तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम यांतील सहभागी सैनिक लाभार्थी असतील. या सर्व नायकांना आम्ही सॅल्युट करतो कारण त्यांनीच आम्हाला हे स्वातंत्र्य भेट दिले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

दरम्यान, आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगावा लागलेल्या मिसाबंदींना निवृत्तीवेतनही लागू करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. हे निवृत्ती वेतन केवळ आर्थिक मदत म्हणून नव्हे तर त्यांनी भारतीय लोकशाहीची मुल्ये जतन करण्यासाठी केलेल्या कामाची पोच पावती आहे, त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ त्यांना हे वेतन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या दोन्ही निर्णयाचे तात्काळ अंबलबजावनी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5