Skip to content Skip to footer

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर ?

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अजून निश्चित झालेले नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपा पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु त्याला तूर्तास ब्रेक लागला होता. आता पुन्हा अब्दुल सत्तार शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सत्तार यांच्या भाजपा प्रवेशाला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडूनच सत्तार यांचे शिवसेनेत राजकीय पुनर्वसन करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बोलून दाखविल्या जात आहे.

सिल्लोड येथील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे सत्तार यांचा लवकरच शिवसेनाप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. आगामी तीन महिन्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. त्यामुळे, पक्षबदली आणि संधी लक्षात घेऊन राजकीय नेत्यांकडून वरीष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींना जोर आला आहे. ‘

‘मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. आगामी काळात निवडणुका आहेत, त्यामुळे सदिच्छा भेट घेणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंशी सविस्तर राजकीय चर्चा झाली. मात्र, नंतर जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवण्यात येईल,” असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5