Skip to content Skip to footer

पीक विमा आणि कर्ज माफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा – सुनील प्रभू

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक वेळी आक्रमक भूमिका मांडलेली आहे. मग शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचे पैसे असो, की पीकविमा योजना या मागण्या पूर्ण करण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्षाला सुद्धा खडे-बोले सुनावले आहे. आता त्याच पावलावर पाऊल ठेऊन शिवसेनेचे मुख्य प्रदोत यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत आक्रमक भूमिका मांडलेली आहे. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत.

विमा अधिकारी आणि कृषी अधिकाऱयांकडून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही. शेतकरी कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे शेतकऱयांना न मिळाल्यास त्यांचा उद्रेक होईल, असा इशारा सुनील प्रभू यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी दिला.
अर्थसंकल्प तसेच दुष्काळावरील चर्चेदरम्यान शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी शेतकऱयांचा पीकविम्याचा प्रश्न मांडला. पीकविम्याचे पैसे शेतकऱयांना अद्याप मिळालेले नाहीत. कागदपत्रांची कारणे देत शेतकऱयांना विमा नाकारला जात आहे.

यामुळे शेतकऱयांच्या भावनांचा उद्रेक होईल, असे सुनील प्रभू म्हणाले.मुंबईत पिण्याच्या पाण्याची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पाऊस पडत नसलेल्या भागात सरकारने कृत्रिम पावसाबाबत सरकारने निर्णय घेतला असल्यास तो योग्य आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात अशा सूचना सुद्धा प्रभू यांनी मांडल्या होत्या.

Leave a comment

0.0/5