पुणे जिल्यातील आक्रमक चेहरा म्हणून पहिल्या जाणाऱ्या तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्य अशा बुचके यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही आहे असे सुद्धा वरिष्ठांकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच पुणे जिल्हा प्रमुख (शिरूर लोकसभा) यांनाही पदापासून दूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षात दगाबाजी करणाऱयांना स्थान नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. या दोन्ही माजी शिसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करून विरोधकाला फायदा पोहचेल अशीच भूमिका लोकसभा निवडणुकीत घेतलेली होती.
लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईची बडगा शिवसेनेकडून उगारण्यात आला आहे, पुणे शहरातील दोन्ही शहर प्रमुखांना पदावरून हटवण्यात आले आहे, आता बुचके आणि गावडे यांना देखील पक्षातून काढण्यात आलं आहे.