Skip to content Skip to footer

दुधाच्या प्लस्टिक पिशव्यांवर एका महिन्यात बंदी लागू होणार – रामदास कदम

आज पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचविणाऱ्या प्लस्टिकचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच प्लॉस्टिकमुळे काही वर्षांपूर्वी मुंबईत मिठी नदीला पूर येऊन मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झालेली होती. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वच महानगर पालिकेने प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू केली होती. त्यातच आता दुधाच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर सुद्धा येणाऱ्या महिन्याभरात बंदी घालण्यात येणार आहे अशी माहिती विधानसभेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलेली आहे.

दुधाची पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ५० पैसे परत द्यायचे ही योजना सर्व दुध कंपन्यांनी मान्य केली आहे. एका महिन्यात हे सुरू होईल अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली. राज्यात दिवसाला १ कोटी दुधाच्या प्लास्टीक पिशव्या रस्त्यावर येतात त्यातून ३१ टन प्लास्टीक कचरा निर्माण होत असल्याचे कदम यांनी सांगितले. राज्यात प्लस्टिक बंदी लागू झाली परंतु दुधाच्या पिशवींना यातून वगळण्यात आले होते.

राज्यात १२०० टन प्लॅस्टीक कचरा राज्यात निर्माण होत होता. प्लास्टीक बंदीनंतर यातील ६०० टन प्लॅस्टीक कचरा कमी झाला. राज्यात येणारे प्लास्टीक हे बाहेरील राज्यातून येतं यात गुजरातमधून ८० टक्के प्लास्टीक येतं. ते बंद करण्यासाठी गुजरात सीमेवर प्लास्टीक ट्रकवर आपण स्वतः जाऊन कारवाई केल्याची माहिती कदम यांनी दिली.

राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लास्टीक जप्त करण्यात आले असून २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लॅस्टीकवर प्रक्रिया करतात. तर सिमेंट कंपन्यांना ३००० हजार टन प्लास्टीक वापरायला दिले असल्याचे कदम यांनी सांगितले..

Leave a comment

0.0/5