Skip to content Skip to footer

जयंत पाटील यांचे आरोप पराभवामुळेच -चंद्रकांतदादा पाटील

पुण्याजवळील मौजे केसनंद आणि बालेवाडी येथील दोन भूखंडांबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरना लाभ मिळवून देणारे निर्णय घेतले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी बुधवारी केला. या प्रकरणावरून राष्ट्र्वादीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रत्यन केलेला आहे असेच प्रथम अंदाजातुन दिसून येते.

या प्रकरणावरून चंद्रकांतदादा पाटील यांचा राजीनामा सुद्धा विरोधांनी मागितलेला होता.
‘लोकसभा निवडणुकीत सांगलीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचा आम्ही पराभव केल्यामुळे त्यामुळे ते माझ्यावर खोटे आरोप करत आहेत,’ असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘केसनंद येथील जमीन इनाम नाही.

ब्रिटिशकालीन मूळ नोंदींनुसार ती देवस्‍थानची जमीन नसून, खासगी आहे. तोच आधार घेत मी निर्णय दिला. तसेच, बालेवाडी येथील जमीन प्रकरणात संबंधित पक्षकाराने जमिनीची मोजणी एका अधिकाऱ्याकडून काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी केली आहे.

तेवढीच मी मान्य केली. या प्रकरणात मी कोणतीही स्थगिती दिलेली नाही. हा केवळ एक प्रशासकीय निर्णय आहे,’ असा खुलासा देखील पाटील यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5