Skip to content Skip to footer

मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश मैत्रेयच्या हजारो गुतंवणूकदारांना दिलासा.

मैत्रेयच्या हजारो गुतंवणूकदारांचे पैसे मिळण्यासाठी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गृहमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतलेली आहे. महाराष्ट्रातून १७ लाख लोकांची २५०० कोटी गुंतवणूक असून राज्यातील गुंतवणूकदारांची १६८७ कोटी रक्कम असून ही रक्कम गुंतवणूकदारांना तातडीने देण्यात यावी यासाठी ना.जयदत्त क्षीरसागर यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यातील गुंतवणूकदारांचा पैसा प्रक्रिया पूर्ण होताच मिळेल असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री केसरकर यांनी दिले आहे.

यावेळी ना.जयदत्त क्षीरसागर यांनी मैत्रेयमधील गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याची ग्राहकांचे पैसे घेऊन या कंपनीने पोबारा केला आहे. कोट्यावधी रूपये ग्राहकांचे अडकल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे. हा पैसा ग्राहकांना तातडीने मिळावा यासाठी त्वरीत कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी बैठकीत केली. यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, मैत्रेयच्या ४५० ठिकाणची मालमत्ता जप्त करण्यात आली असून राजस्थान, मध्यप्रदेशातही या कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच ही मालमत्ता विकून लवकरात लवकर गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5