Skip to content Skip to footer

युवासेना पदाधिकारी यांच्या तर्फे दुष्काळग्रस्थांसाठी रु.८७०००/- चा धनादेश आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्त…..

राज्यात पडलेल्या दुष्काळग्रस्थांच्या मदतीसाठी शिवसेना तसेच युवासेना सरसावली आहे. राज्यात दुष्काळग्रस्थ भागात चार छावणी, पिण्याच्या पाण्याचे टँकरराज्यात पडलेल्या दुष्काळग्रस्थांच्या मदतीसाठी शिवसेना तसेच युवासेना सरसावली आहे. राज्यात दुष्काळग्रस्थ भागात चार छावणी, पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविण्याचे काम शिवसेना आणि युवासेना तर्फे करण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबांना पुढील दहा दिवस पुरेल इतके अन्नधान्य व भोजन साहित्य पोहोचवण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. यातच आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा.श्री. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त युवासेना उपसचिव, विस्तारक, सहसचिव, मुंबई समन्वयक यांच्या तर्फे ८७ हजार रुपयेच धनादेश महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात आलेला आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे बॅनर न लावता त्याजागी महाराष्ट्रात जिथे-जिथे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेले आहे. तिथे जाऊन तेथील नागरिकांना आप-आपल्या परीने मदत करण्याचे आदेश दिलेले होते.

आज त्या निधीचा धनादेश आदित्य साहेबांना शिवसेना भवन येथे सुपुर्द करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना सचिव श्री. सूरज चव्हाण, नगरसेवक श्री. अमेय घोले,कार्यकारिणी सदस्य श्री. प्रवीण पाटकर, युवासेना उपसचिव निलेश महाले, संदीप वरखडे,शार्दुल म्हाडगूत,सिद्धेश धाऊसकर, विस्तारक रणजीत कदम, सहसचिव प्रथमेश वराडकर, जसप्रीत सिंग वडेरा, अभय चव्हाण, विराज बनसोड उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5