Skip to content Skip to footer

चर्चेत राहण्यासाठी भारतीय संघाच्या जर्सीचा विषय विरोधक काढत आहे-गुलाबराव पाटील

नेहमी सतत चर्चेत राहण्यासाठी विरोधक नव-नवीन विषय शोधून काढत आहे असेच त्यांच्या वागण्यातून जाणवत आहे. समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांनी भारतीय संघाच्या भगव्या जर्सी बद्दल आक्षेप घेतलेला आहे. आझमी त्यांच्या आक्षेपावर शिवसेना पक्षाने सडेतोड उत्तर दिलेले आहे. विरोधकांकडे चर्चेत राहण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीचा विषय काढला जात आहे, अशी टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली. आयसीसीच्या नियमानुसार भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड या सामान्या दरम्यान भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी यावर आक्षेप घेतला. अबू आझमी यांच्या या आक्षेपावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या जर्सीवरून विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. धकांकडे चर्चेत राहण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीचा विषय काढला जात आहे अशी टीका, गुलाबराव पाटील यांनी केला.

Leave a comment

0.0/5