Skip to content Skip to footer

राहुल गांधी यांच्या विधानानंतर १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा…….

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे ठरविले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ‘मला दु:ख आहे की, माझ्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला नाही’ अशी प्रतिक्रिया दिला. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर मात्र आता काँग्रेसमध्ये अनेकांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाकडे सुपूर्त केला होता.

राहुल गांधी यांच्या विधानानंतर मात्र आता काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले असून आतापर्यंत १५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या स्थानावरील नेत्यांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. पक्षाचे महासचिव दीपक बाबरियासोबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी युथ काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या घरावर धडकले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा विचार सोडावा असा आग्रह धरला.

दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी मी राजीनाम्यावर ठाम आहे. पण, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मी पूर्ण क्षमतेने लढा देणार. आज मी निवडणुका हरलो आहे. पण, मी कुणाकडे बोट दाखवल्यास तीन बोटं माझ्याकडे असणार आहे. शिवाय, ज्यांना लगेचच सत्ता हवी त्यांनी भाजपकडे जावं. पण, जो शेवटपर्यंत लढा देईल तोच खरा शिपाई’ असल्याचे राहुल गांधी यांनी म्हणून दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5