Skip to content Skip to footer

जयंत पाटलांना धनगर समाजाकडून समज,”सांभाळून बोला अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही”

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या दरम्यान धनगर समजा बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे धनगर समाजातील नेते काहीसे राष्ट्रवादीवर नाराज झालेले दिसून येत आहे. आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या काळात धनगर समाजाविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्य त्यांनाच भोवलेले दिसत आहे. या वक्तव्यामूळे धनगर समाज कृती समितीने पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यापुढे धनगर समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकरांची मल्हार सेना आपणांस महाराष्ट्रात फिरू देणार नाही ,असा इशारा देखील पाटील यांना देण्यात आला आहे.

अधिवेशन काळात जयंत पाटील यांनी विधान भवनात बोलताना धनगर समाजाची तुलना शेळ्या मेंढ्या सोबत केली. यावरून धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमासमोर जाहीर माफी मागावी. धनगर समाजाबद्दल केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे ,की राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे हे मत आहे. याचा खुलासा करावा अशी मागणी मल्हार सेनेने केली आहे.

आमच्या समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकरांची मल्हार सेना आपणांस महाराष्ट्रात फिरू देणार नाही ,असा इशारा पाटील यांना देण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5