Skip to content Skip to footer

नगर मध्ये विखे पर्वाला सुरवात, शिर्डी नगरपंचायत बिनविरोध विजयी……

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे पर्वाला सुरवात झाली आहे असे म्हंटलं तर वावगे ठरणार नाही. आज पुन्हा एकदा विखे-पाटील परिवाराने नगर मध्ये आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे. शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन यांची बिनविरोध झाली आहे. अध्यक्ष पदासाठी अभय शेळके पाटील, जगन्नाथ गोंदकर व अर्चना कोते यांनी अर्ज दाखल केले होते. तिघेही विखेंचे कट्टर समर्थक होते.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर अध्यक्षपदी अर्चना उत्तमराव कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश वामन त्रिभुवन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय कोते, रवी गोंदकर, शिवसेनेचे विजय जगताप उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5