Skip to content Skip to footer

पुढील दोन-तीन दिवस मुंबई अतिवृष्टीचा धोका नागरिकांनी सतर्क राहावे-देवेंद्र फडणवीस

गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील दोन-तीन दिवस मुंबईला पावसाचा धोका आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पावसाचा सामना करण्यासाठी सरकार आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी अॅलर्टवर आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून१८ जणांचा मृत्यू झाला. रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आपल्याला अतीव दुःख झालं असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करत आहोत अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. जे या घटनेत जखमी झाले आहेत त्यांना लवकरात लवकर आराम पडू दे अशीही मी प्रार्थना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5