Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ” माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र” अभियानाला सुरवात.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी हा वाढदिवस ” माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र ‘ अभियान राबवून साजरा केला जाणार आहे. 1 ते 31 जुलै या काळात जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळावे, शेतकरी कर्जमुक्ती, पीक विमा योजनेचा आढावा यासह आठवी ते पदवीधर विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुका पाहता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. “माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हा व राज्यात शिवसेनेची यापुढील वाटचाल असणार आहे.
आगामी निवडणुका शिवसेना-भाजप युती करूनच लढणार हे स्पष्ट असले तरी राज्यात मोठा भाऊ कोण ? हे सिध्द करण्यासाठी दोन्ही पक्ष आपली शक्ती पणाला लावणार आहे.

Leave a comment

0.0/5