Skip to content Skip to footer

वंचीतकडून काँग्रेसला ४० जागांची ऑफर

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना वंचितने काँग्रेस बरोबर युती करण्याच्या निर्णयावर विचारपूर्वक भाष्य केले आहे. मुंबई मध्ये पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत वंचित काँग्रेस बरोबर युती करायला तयार आहे. परंतु २८८ जागा पैकी फक्त काँग्रेस पक्षाला ४० जागा सोडणार असल्याचे बोलून दाखविले आहे. तसेच याच फॉर्मुल्यावर काँग्रेस बरोबर युती करायला वंचित तयार असल्याचे वंचितचे प्रवक्ते गोपीचंद पडवळकर यांनी बोलून दाखविले आहे. तसेच येणाऱ्या दोन दिवसात काँग्रेसने आपला निर्णय कळवावा अन्यथा वंचित राज्यातील सर्व जागेवर आपले उमेदवार उभे करेल असा इशारा सुद्धा काँग्रेसला दिलेला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयावर काँग्रेसचे केंद्रातील नेते तसेच महाराष्ट्रातील निर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काही दिवसात समजून येतील. आधीच काँग्रेसने वंचितला भाजपाची “बी” टीम म्हणून वंचित बरोबर आपले संबंध बिघडविले होते.

आता त्यात काँग्रेस सारख्या बड्या पक्षाला एका नवख्या पक्षाने काही तुरळक जागेची ऑफर दिल्याने काँग्रेसचे महाराष्ट्रात असलेले वजन सुद्धा संपुष्ठात आलेले आहे असेच आज राजकीय विश्लेषकांना वाटते. काही दिवसापूर्वी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जागे संदर्भात केंद्रातील नेत्याशी बोलणार असल्याचे सुद्धा बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5