Skip to content Skip to footer

तातडीने नवा अध्यक्ष शोधा, मी अध्यक्ष पद सोडले आहे – राहुल गांधी

मी आता काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेलो नाही. त्यामुळे पक्षाने तातडीने नव्या अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मला काँग्रेसच्या अध्यक्षपदात रस नाही. त्यामुळे पक्षाने थोडाही उशीर न करता नव्या अध्यक्षाची निवड करायला पाहिजे. मी यापूर्वीच माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकारिणीची लवकरात लवकर बैठक व्हायला पाहिजे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून विजयी झाले होते. तर अमेठीमध्ये त्यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता.

या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5