Skip to content Skip to footer

पवारांची तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज…..

येणाऱ्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे. काही दिवसापूर्वीच राष्ट्र्वादीने राज्यातील विधानसभेसाठी तमाम इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविलेले होते. परंतु राष्ट्र्वादीने राज्यातील २८८ जागेवर अर्ज मागविल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसला बरोबर न घेता निवडणुकीला सामोरे जाणार का? असाच प्रश्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पडलेला आहे. त्यातच पवारांचे नातू हे सुद्धा येणाऱ्या निवडणुकीला कर्जत-जामखेड मतदार संघातून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तसे खुद्द रोहित पवारांनी या मतदार संघाची मागणी शरद पवारांकडे केलेली आहे.

रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, तिथून उभं राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात चाचपणी करत होते. उन्हाळ्यात त्यांनी या भागातील लोकांसाठी टँकर सुरु करुन जनसंपर्क वाढवण्याचाही प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नगर जिल्हाध्यक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज भरुन दिला आहे.

दरम्यान, कर्जत-जामखेड हा मतदारसंघ कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे रोहित पवार यांना जर कर्जत-जामखेडमधून उमेदवारी मिळाली तर शिंदे विरुद्ध पवार हि लढत रंगतदार होईल यात शंका नाही. तसेच हा मतदार संघ अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा मतदार संघ म्हणून पहिला जातो.

पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीला मिळालेल्या तिकटीमुळे रोहित पवार काहीसे नाराज झाले होते. तसेच त्यांनी ट्विटद्वारे आपली नाराजी व्यक्त सुद्धा केली होती. हाच राग साध्य अजित पवार यांच्या कार्यकर्त्यामध्ये असलेला दिसून येत होता. तसेच त्यांनी रोहीत पवार यांच्या उमेदवारीला विरोध सुद्धा दर्शविला होता.

Leave a comment

0.0/5